मुंबई - अहमदनगर येथील कोपर्डी गावात एका लहान मुलीवर ३ नराधमांनी बलात्कार केल्यावर तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काल शनिवारी मुंबईत पुन्हा मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुलीला श्रद्धांजली वाहिली.
कोपर्डी प्रकरण - 'त्या' ताईला मराठा समाजाची मुंबईत श्रद्धांजली
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात दिनांक १३ जुलै २०१६ या दिवशी काळिमा फासणारी घटना घडली. एका १४ वर्षीय मुलीवर ३ नराधमांनी बलात्कार केल्यावर तिची निघृण हत्या केली होती. या घटनेला ३ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने काल शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी मराठा समाजातील लोक मोठ्या संख्येने येतील म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, फक्त १० ते १२ जण जमले होते. आज या "ताई"मुळेच मराठा समाज एकत्र आला आणि आम्हाला आरक्षण मिळाले म्हणून आम्ही तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आलो आहे, असे यावेळी पत्रकारांशी बोलताना उपस्थितांनी सांगितले. तसेच मराठा समाजाच्या लोकांनी यावेळी 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणाही दिल्या.