मुंबई- आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते, परंतु आंदोलन करण्यापूर्वीच काही मराठा आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आंदोलक औरंगाबाद परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षण मुद्यावरून मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बाधण्याचा होता प्रयत्न; मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षण मुद्यावरून मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजाकडून तसेच मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून शंका उपस्थित केल्या होत्या. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर आंदोलन करून हे आंदोलक आपला निषेध जाहीर करणार होते. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, माता रमाबाई पोलीस स्टेशन मध्ये या आंदोलकांना नेण्यात आले आहे.
![मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बाधण्याचा होता प्रयत्न; मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11875693-628-11875693-1621836597114.jpg)
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण त्याआधीच या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजात असंतोषाची लाट आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजाकडून तसेच मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून शंका उपस्थित केल्या होत्या. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर आंदोलन करून हे आंदोलक आपला निषेध जाहीर करणार होते. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, माता रमाबाई पोलीस स्टेशन मध्ये या आंदोलकांना नेण्यात आले आहे.