महाराष्ट्र

maharashtra

Loan App Fraud Case : मुंबईतील लोन ॲप फसवणूक प्रकरणात अनेकांचे बळी; तपास सायबर पोलिसांकडे वर्ग

By

Published : Jun 5, 2022, 7:22 PM IST

मुंबईत कोरोना काळानंतर आर्थिक परिस्थिती बिघडल्याने (Unemployment Rose During The Corona Period) लोकांनी लोन ॲपच्या माध्यमातून आपली चणचण कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोन ॲपच्या माध्यमातून मिळणारे पैसे ही नुसती फसवणूक (Loan Apps Fraud Case) ठरली आणि त्याने अनेकांचे जीव (Loan app fraud kills many) घेतले. लोन ॲपच्या माध्यमातून फक्त लोकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार घडू लागले आहेत

Loan Apps Fraud Case
लोन ॲप्स फसवणूक प्रकरण

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन लोन ॲपच्या माध्यमातून फसवणूक होत (Loan App Fraud case in Mumbai) असल्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत विविध पोलीस स्टेशनमध्ये 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ह्या सर्व गुन्ह्यांचा तपास आता सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला, नंतर सायबर पोलिसांकडून खास पथक तयार करण्यात आले आहे.


लाॅकडाऊन काळातील आर्थिक चणचण : लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर घराचे हप्ते आणि इतर खर्चासाठी अनेकांनी कर्जासाठी विविध खासगी वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे अर्ज केले होते. त्याच काळात कागदपत्रे देऊन अवघ्या काही मिनिटांत कर्ज देऊ, अशी सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आली होती. त्या जाहिरातींना बळी पडून अनेकांनी लोन ॲप्सवरून कर्ज घेण्यास सुरुवात केली.

लोन ॲप फसवणूक प्रकरणातील पहिला बळी : 50 हजार रुपयांचे कर्ज देऊ, असे सांगून नागरिकांना 2 ते 8 हजार रुपये इतकी रक्कम देऊन ती पठाणी स्वरूपात वसूल करण्यास सुरुवात केली. यंदाच्या वर्षात वसुलीसाठी लोन ॲप्सशी संबंधित असलेल्या कंपन्यांनी कर्जदाराची बदनामी अधिक जोरात केली. त्या बदनामीचा पहिला बळी मालाड येथे गेला. कर्ज घेतले नसतानाही बदनामी होत असल्याने तरुणाने आत्महत्या केली होती. त्याची दखल मुंबई पोलिसांनी घेतली.

मुंबईचे विशेष पथकाकडून तपास : मुंबईत दाखल असलेल्या 21 गुन्ह्यांचा तपास आता मुंबई सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पाचही प्रादेशिक विभागांत सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक आता या गुह्याचा तपास करणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


या प्रकरणी पोलिसांचे व्हॉट्सॲपला पत्र : तपासादरम्यान प्ले स्टोअरवर एकूण 103 बनावट लोन ॲप्स असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच 223 हे बनावट व्हॉट्सॲप नंबर असून, त्याचा अन्य व्यक्ती वापर करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी प्ले स्टोअर आणि व्हॉट्सॲपला पत्र लिहून कारवाई करण्यास सांगितले आहे.



लोन ॲपचा आणखी एक बळी : पाच हजार रुपयांच्या कर्जाच्या रकमेपोटी सव्वाचार लाख रुपये वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चुनाभट्टी येथील एक तक्रारदार पत्नी आजारी पडल्याने, उपचारासाठी तक्रारदाराला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने एक लोन ॲप डाऊनलोड करून 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. त्यासाठी त्यांनी आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील ॲपवर अपलोड केला. 90 दिवसांत कर्ज पुन्हा परतफेड करावे लागेल, असे तक्रारदाराला सांगण्यात आले.

तक्रारदाराला मिळाले 5 हजार वसूल केले 4 लाख : तक्रारदाराला 50 हजार रुपयांऐवजी फक्त पाच हजार रुपयांचे कर्ज आले. त्यानंतर त्याला विविध नंबरवरून फोन येऊ लागले. एकाने तक्रारदारराला मोबाईलवर लिंक पाठवून पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतरदेखील तक्रारदाराला धमकीचे फोन येत होते. वारंवार येणारे कॉल मेसेजमुळे त्रस्त तक्रारदाराने सव्वाचार लाख रुपये जमा केले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.


हेही वाचा : Loan App Defrauded : इन्स्टंट लोन अ‍ॅपचा गंडा; 50 हजाराच्या कर्जावर उकळले 4.15 लाख रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details