मुंबई- आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई मध्ये निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर पक्षांची ताकद वाढताना दिसत आहे.
रिपब्लिकन पार्टीत इन्कमिंगची वारी! मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश - Republican Party of India
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई मध्ये निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर पक्षांची ताकद वाढताना दिसत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) या पक्षात मोठ्या प्रमाणात मुंबई मधील पदाधिकाऱ्यांचा काल पक्ष प्रवेश झाला. शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टीत पक्षप्रवेश केला. त्यावेळी महिला अध्यक्ष सुनीताताई चव्हाण त्याच्यांकडून हा पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी पक्षाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनीता ताई चव्हाण त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना भविष्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिपक निकाळजे यांची भेट घेऊन पुढील कामांसाठी यांना शुभेच्छा दिल्या.