मुंबई - मनसेने हिंदुत्ववादाच्या मुद्द्यांवर नवीन राजकीय भूमिका घेतल्यावर मनसेत मोठया प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे. शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौटगे आणि शिवसेना नेते आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाहीर प्रवेश केला.
मनसेच्या नवीन राजकीय भूमिकेनंतर हर्षवर्धन जाधव, प्रकाश कौटगे यांचा पक्ष प्रवेश - News about Raj Thackeray
मनसेने हिंदुत्वावादाची नवीन राजकीय भूमिका घेतल्यानंतर मनसेत इन्कमिंग सुरू झाली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन, प्राकश कौटगे, सुहास दशरथे यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
![मनसेच्या नवीन राजकीय भूमिकेनंतर हर्षवर्धन जाधव, प्रकाश कौटगे यांचा पक्ष प्रवेश Many leaders are entering the party after MNS took new political role](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6003246-395-6003246-1581158410493.jpg)
मनसेच्या नवीन राजकीय भूमिकेनंतर हर्षवर्धन जाधव, प्रकाश कौटगे यांचा पक्ष प्रवेश
मनसेच्या नवीन राजकीय भूमिकेनंतर हर्षवर्धन जाधव, प्रकाश कौटगे यांचा पक्ष प्रवेश
रविवारी होणाऱ्या मोर्चाआधी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन यांनी देखील आज मनसेत प्रवेश केला. रविवारी मनसेचा महामोर्चा मुंबईत असणार आहे. या मोर्चाला परवानगी दिली नाही, तरी हा मोर्चा निघणारच अशी भुमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.