महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Power Outage Mantralaya : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी पूर्वीच मंत्रालयातील बत्ती गुल - मंत्रालयात वीज खंडित

राज्यावर वीज टंचाईचे ( Power shortage ) संकट ओढवले असतानाच त्याची झळ मंत्रालयात ( Power outage in Mantralaya ) पोहोचत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मागच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( State Cabinet Meeting ) अर्धवट सोडण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली होती.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : May 26, 2022, 3:40 PM IST

मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आज ( गुरुवारी ) मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधार पसरला. यामुळे कामकाज पुन्हा ठप्प झाले असून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न बेस्टकडून सुरू आहेत. राज्यावर वीज टंचाईचे ( Power shortage ) संकट ओढवले असतानाच त्याची झळ मंत्रालयात ( Power outage in Mantralaya ) पोहोचत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मागच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( State Cabinet Meeting ) अर्धवट सोडण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली होती. पुन्हा सकाळच्या सुमारास मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.


मंत्रालय हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख वास्तू. संपूर्ण राज्याचा गाडा येथून हाकला जातो. त्याच मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील वीज पुरवठा सकाळी ११ वाजून ३९ मिनिटाच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. राज्य मंत्रिमंडळाच्या मंडळ बैठकीच्या पूर्वीच अचानक बत्ती गुल झाल्याने सर्वच दालनात अंधार पसरला. कार्यालयीन कामे यामुळे ठप्प झाली. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न बेस्ट प्रशासनाकडून सुरू आहेत.

हेही वाचा -Minister Bungalow Electricity Issue :...अन् पुन्हा मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती झाली गुल!

ABOUT THE AUTHOR

...view details