मुंबई - मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसाला सोडचिठ्ठी देत आज (दि. ५ऑगस्ट) सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकरे दाम्पत्याला शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मानखुर्द परिसरातून 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले विठ्ठल लोकरे यांनी 90 च्या दशकात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. शनिवारी 3 ऑगस्टला त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व उत्तर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसाला सोडचिट्ठी देत आज (दि. ५ऑगस्ट)रोजी सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका मुख्यालयात त्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यानंतर कार्यकर्त्यांसह विठ्ठल लोकरे आणि माजी नगरसेविका सुनंदा लोकरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आणि भगवा झेंडा हाती घेतला.
तुम्हा सगळ्यांच्या साथीने विठ्ठलाला शिवसेनेत प्रवेश देतोय; त्याच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन उद्धवजी ठाकरे यांनी उपस्थितांना केले.