महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Manisha Kayande on Darekars Arrest : प्रवीण दरेकरांना अटक व्हायलाच हवी- आमदार मनिषा कायंदे यांची मागणी - महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन चर्चा

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे ईटीव्ही भारतशी बोलताना ( Manisha Kayande on Pravin Darekar arrest ) म्हणाल्या, की प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते ही सभागृहाची गरीमा आहे. येथे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होते. भाजपला लोकांच्या समस्यांशी काही घेणे-देणे नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखला झाला. त्यामुळे दरेकरांना अटक करायला हवी, अशी मागणी कायंदे यांनी केली. तसेच दरेकरांना पदावर राहण्याचा नैतिक ( Pravin Darekar moral right ) अधिकार नाही.

आमदार मनिषा कायंदे
आमदार मनिषा कायंदे

By

Published : Mar 15, 2022, 5:52 PM IST

Updated : Mar 15, 2022, 10:15 PM IST

मुंबई -मुंबै बॅंकेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर ( police case against Pravin Darekar ) गुन्हा दाखल झाला. याचे विधानभवनात पडसाद उमटले आहेत. विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ( Maharashtra assembly session ) तहकूब करण्यात आले. दरम्यान, शिवसेना दरेकर यांच्या मागणीसाठी सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरेकर यांना अटक झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. विधानभवनात त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे ईटीव्ही भारतशी बोलताना ( Manisha Kayande on Pravin Darekar arrest ) म्हणाल्या, की प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते ही सभागृहाची गरीमा आहे. येथे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होते. भाजपला लोकांच्या समस्यांशी काही घेणे-देणे नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखला झाला. त्यामुळे दरेकरांना अटक करायला हवी, अशी मागणी कायंदे यांनी केली. तसेच दरेकरांना पदावर राहण्याचा नैतिक ( Pravin Darekar moral right ) अधिकार नाही, असे सांगत लालकृष्ण अडवाणी यांच्यावरील हवालाच्या आरोपांचा कायंदे यांनी दाखला दिला. तसेच दोषमुक्त झाल्यावर ते सभागृहात आल्याची आठवण करून दिली. भाजपचा हा पायंडा असून नवे सदस्यांना त्याचे विस्मरण झाल्याचे कायंदे म्हणाल्या आहेत.

प्रवीण दरेकरांना अटक व्हायलाच हवी

हेही वाचा-Shocking News : 11 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

बघ्याची भूमिका घ्यायची का
सभागृहाने दरेकर यांचा राजीनामा द्यायला हवा. दरेकरांचा गुन्हा खोटा असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन त्यांनी स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावे, असे कायंदे यांनी सांगितले. एकीकडे आमच्या नेत्यांचे राजीनामा मागायचे. दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरुन कुरघोडी करायच्या ही भाजपची नीती आहे. मग, आम्ही बघ्याची भूमिका घ्यायची का, असा थेट इशाराच विरोधकांना कायंदे यांनी दिला.

हेही वाचा-Pravin Darekar : प्रवीण दरेकर म्हणजे दीड कोटींच्या गाडीतून फिरणारा मजूर.. हजारो कोटी कमावले.. तक्रारदाराचा आरोप

मलिक यांनी सातत्याने संबंधित विषयावर खुलासे केले
सरकार सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोप केला. पडळकर यांना गुन्ह्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. गृहराज्य मंत्र्यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याचा पाढा विधानपरिषदेत वाचून दाखविला. पडळकरांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न विचारला असता, आमच्याशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. मात्र, प्रविण दरेकर यांना अटक व्हायला हवी, अशी मागणी केली. मंत्री नवाब मलिक आणि प्रविण दरेकर यांच्याबाबत सरकार वेगळा नियम लावत आहेत. कायंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. मलिक यांनी सातत्याने संबंधित विषयावर खुलासे केले आहेत. तसेच हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित नाही, अशी शिवसेना नेत्या कायंदे यांनी भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा-Power Minister Nitin Raut - शेतकऱ्यांना दिलासा, शेतात पीक असेपर्यंत वीज तोडणी नाही - ऊर्जामंत्री

महिलांची काळजी घेणारे सरकार
महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने मांडलेल्या शक्ती विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्यामुळे महिलांना सर्वाधिक संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशात महिलांची काळजी घेणारे पहिले राज्य सरकार ठरले आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी स्तुतीसुमने उधळली. आगामी काळात महिलांच्या प्रश्नासाठी विशेष कोर्टाची निर्मितीही केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.


कायदा फायदेशीर ठरणार
महिला अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवले होते. 'शक्ती' विधेयक डिसेंबरमध्ये विधिमंडळात एकमताने मंजूर केले होते. आंध्र प्रदेशच्या 'शक्ती' कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'शक्ती' फौजदारी विधेयक मांडण्यात आले होते. हे विधेयक विधिमंडळात समंत करुन राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले. राज्यपालांनी ते राष्ट्रपतींकडे पाठवले होते. यावर राष्ट्रपतींनी आज स्वाक्षरी केल्याने कायद्यात रुपांतर होणार आहे. महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी शक्ती फौजदारी कायदा फायदेशीर ठरणार आहे, असे शिवसेना नेत्या कायंदे म्हणाल्या.

लवकरच विशेष कोर्टाची निर्मिती
महिलांना सक्षमतेने लढणे, गुन्हेगारीला आळा घालणे, महिलांवरील बलात्कारा सारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद या 'शक्ती' कायद्यात आहे. महाराष्ट्रात हा कायदा लागू झाल्याने विकृत गुन्हेगारांवर जरब बसणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतलेला महाराष्ट्र देशातील पहिला राज्य आहे, असे कायंदे यांनी सांगितले. महिलांच्या प्रश्नांसाठी लवकरच विशेष कोर्टाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे कायंदे यांनी स्पष्ट केले.

भाजपमधील घराणेशाही यादी मोठी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुढे राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीला थारा देणार नसल्याचेे संकेत दिले आहेत. मनिषा कायंदे यांनी यावरदेखील भाष्य केले. भाजपमधील घराणेशाही यादी मोठी आहे. परंतु, राजकीय जीवनात लोकांची सेवा करायची कोणाला इच्छा असेल तर काय हरकत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Last Updated : Mar 15, 2022, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details