मुंबई - भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. या पैकी महात्मा गांधी यांनी छेडलेल्या असहयोग, सविनय कायदे भंग, दांडी यात्रा आदी आंदोलने करताना महत्वपूर्ण अशा बैठका मुंबईमधील 'मणि भवन' या वास्तूत झाल्या. गांधीजींना याच भवनमधून अटक झाली हा इतिहास बहुतेकांना माहीत असेल. मात्र याच भवनमध्ये वास्तव करताना महात्मा गांधीजींच्या पेहरावात बदल झाला. याच ठिकाणी गांधीजीं चरखा चालवायला शिकले, अशी माहिती मणि भवन गांधी संग्रहालयाचे कार्यकारी सचिव मेघश्याम आजगांवकर यांनी दिली.
- आंदोलनाचे साक्षीदार -
मणि भवन मुंबईच्या गांवदेवी येथे आहे. गांधीजींचे मित्र असलेल्या रेवाशंकर जगजीवन झवेरी यांच्या मालकीचे हे भवन होते. गांधीजी या भवनमध्ये पाहुणे म्हणून येत असत. महात्मा गांधींनी दक्षिण अफ्रिकेत कृष्णवणीर्यांसाठी लढा दिल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते भारतात परतले. त्यावेळी झवेरी यांनी हे भवन गांधीजींना राहायला दिले. १९१७ ते १९३४ या काळात गांधीजी मणी भवनमध्ये राहायला होते. हा काळ भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचा असा काळ होता. या काळात गांधीजींनी असहयोग, सविनय कायदे भंग, दांडी यात्रा आदी आंदोलने सुरु केली. या आंदोलनाच्या बैठका मणि भवनमध्ये होत असत. पंडित नेहरू यांच्यासह देशातील, परदेशातील अनेक मोठे नेते गांधीजींना याच ठिकाणी भेटायला येत असत. या भवनमधील दुसऱ्या मजल्यावर गांधीजी राहत असत. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात या इमारतीच्या गच्चीवर बैठका होत असत. स्वातंत्र्य आंदोलनदरम्यान ४ जानेवारी १९३२ ला पहाटे याच इमारतीच्या गच्चीवरून गांधीजींना इंग्रज सैनिकांनी अटक केली होती. २७ आणि २८ जून १९३४ ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक येथे घेण्यात आली. त्यानंतर गांधीजी या वास्तूत पुन्हा कधी आले नाही अशी माहिती आजगांवकर यांनी दिली.
- याच ठिकाणी चरखा चालवायला शिकले -
१९१७ मध्ये गांधीजी मणि भवनमध्ये वास्त्यव्याला आले. त्यावेळी भवनच्या परिसरातून गादीचा कापूस विणणारे लोक ये जा करत असत. या लोकांकडून गांधीजींनी कापूस विणण्याची कला शिकली. पुढे त्यांनी चरखा चालवण्याची कला ही याच भवनमध्ये शिकली. मणि भवनमध्ये दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत आजही अनेक चरखे, त्यावेळी वापरत असलेला फोन आदी वस्तू जतन करून ठेवण्यात आले आहेत. गांधीजींच्या वापरातील खऱ्या वस्तू दिल्लीच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्याच्या प्रतिकृती मणि भवनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. बकरीचे दूध - १९१७ मध्ये मणि भवनमध्ये गांधीजी वास्त्यव्यास आले. त्यानंतर १९१९ मध्ये ते आजारी पडले होते. गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांना निकटवर्तीयांनी बकरीचे दूध देण्याचा सल्ला दिला होता. कस्तुरबा यांनी गांधीजींना बकरीचे दूध पिण्याचा आग्रह धरला. कस्तुरबा यांच्या हट्टावरून गांधीजींनी पहिल्यांदाच बकरीचे दूध पिण्यास सुरुवात केली.
हेही वाचा -अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता
- ५० हजार पुस्तकांची लायब्ररी -