मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Rich minister in eknath shinde cabinet ) यांच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास अनेक अर्थाने थक्क करणारी माहिती समोर येत आहे. १८ मंत्र्यांपैकी जवळपास १२ मंत्र्यांवर राजकीय, तसेच गुन्हेगारी स्वरुपातील गुन्हे ( eknath shinde cabinet expansion ) दाखल आहेत. मंत्रिमंडळाचे सर्वच मंत्री त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, कोट्यधीश असून यामध्ये ( Mangal prabhat lodha is rich minister ) सर्वाधिक ४४१ कोटी रुपयांची संपत्ती ही भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांच्याकडे आहे. तर, सर्वात कमी २ कोटी रुपयांची संपत्ती ही शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे ( Sandipan Bhumre less rich minister ) यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री दहावी पास तर एका मंत्र्याने डॉक्टोरेट मिळवली आहे.
मंगल प्रभात लोढा सर्वात श्रीमंत मंत्री - व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असलेले मलबार हिलचे भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सहा वेळा आमदारकी भूषविणाऱ्या लोढा यांच्याकडे २५२ कोटी रुपयांची चल, तर १८९ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. या शिवाय दक्षिण मुंबईत लोढा यांच्याकडे पाच फ्लॅट आहेत. लोढा यांच्या विरोधात पाच गुन्हे सुद्धा दाखल आहेत. तर, लोढा यांच्या खालोखाल उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विजयी झालेले एकनाथ शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्याकडे ११५ कोटींची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर शिंदे गटाचे प्रवक्ते सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे ८२ कोटी रुपयांची संपत्ती आहे.