मुंबई - पुण्यातील भोसरी जमीन कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची आज ईडीकडून कार्यालयात 3 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर मंदाकिनी खडसे पुन्हा घरी निघून गेल्या न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे दर शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागते.
उच्च न्यायालयाने दिला होता जामीन -
पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पत्नी मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला होता. दरम्यान 17 ऑक्टोबर ते 7 डिसेंबरपर्यंत तपास यंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देत याकाळात आठवड्यातून दोनदा, दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खडसेंना निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी दिले होते. भोसरी जमीन घोटाळ्यातील खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्याने पीएमएलए कोर्टाकने मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे, ज्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावेळी तपास यंत्रणाना सहकार्य करण्याच्या अटीवरच मंदाकिनी खडसे यांना जामीन देण्यात आला होता.
काय आहे हे प्रकरण?