महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Crime News : 'तुझमें दम नहीं हैं...' म्हटल्याने प्रियकराने केली प्रियसीची हत्या

मुंबई उपनगरात राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला जीआरपीने अटक केली आहे. प्रेयसिने गंमतीने आरोपीला नल्ला म्हणजेच नपुंसक म्हटल्याने ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी ( Man Killed Women After Called Him Impotetnt ) दिली.

crime news
crime news

By

Published : May 25, 2022, 4:30 PM IST

मुंबई -मुंबई उपनगरात राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला जीआरपीने अटक केली आहे. खरे तर प्रियसिने गंमतीने आरोपीला नल्ला म्हणजेच नपुंसक म्हटले होते. त्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि आरोपीने चाकूने वार करून तिचा खून ( Man Killed Women After Called Him Impotetnt ) केला. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपींनी मृतदेह गोणीत टाकून माहीम येथील रेल्वे रुळाच्या बाजूला फेकून दिला, अशी माहिती पोलिसांकडून आज ( 25 मे ) पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.

आरोपी व्यक्तीचे नाव विकास खैरनार असे आहे. विकासने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह लोकल ट्रेनच्या रुळांवर फेकून दिला होता. पण, आरोपीने खून केल्याचे उघड झाले. मृतदेहाच्या गोणीमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात मदत झाली. रेल्वे जीआरपीने अवघ्या आठ तासात या खुनाचे गूढ उकलले.

डीसीपी संदीप भाजीभाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, मयत 30 वर्षीय महिला ही गोरेगाव दिंडोशी परिसरातील रहिवासी होती. महिला विवाहित असून, ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. त्याच कंपनीत काम करणाऱ्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी महिलेने गंमतीने आरोपीला 'तुझमें दम नहीं है' असे म्हटले होते. याचा राग मनात धरून आरोपीने महिलेचा खून केला.

पुढे पोलिसांनी म्हटले की, एका गोणीने या हत्येचे रहस्य उलगडले. ज्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला होता, त्यावर गोरेगावचा पत्ता लिहिला होता. पोलीस पथकाने त्या पत्त्यावर तपास सुरू करून माहिती देणाऱ्यांना सक्रिय केले होते. तपासासंदर्भात पोलिसांचे एक पथक दिंडोशी पोलीस ठाण्यात गेले. तिथे महिलेच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबियांनी सांगितले, महिला एका कंपनीत काम करते होती. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले. कंपनी कर्मचाऱ्यांच्या चौकशीत आरोपीचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -Afzal Khan Tomb Security : प्रतापगड पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details