महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Worli Gas Cylinder Blast : वरळी गॅस सिलिंडर स्फोट, बालकानंतर वडीलाचाही मृत्यू - BDD Chawl Worli

वरळी बीडीडी चाळ ( BDD Chawl Worli ) येथे मंगळवारी (दि. 30 नोव्हेंबर) सिलिंडर स्फोट ( Worli Gas Cylinder Blast ) झाला होता. या स्फोटात एकाच घरातील चार जण जखमी झाले होते. त्यापैकी एका लहान बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आज (दि. 4) या बालकाच्या वाडिलाचाही नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्याने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. याचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 4, 2021, 5:24 PM IST

मुंबई- वरळी बीडीडी चाळ ( BDD Chawl Worli ) येथे मंगळवारी (दि. 30 नोव्हेंबर) सिलिंडर ( Worli Gas Cylinder Blast ) स्फोट झाला. या स्फोटात एकाच घरातील चार जण जखमी झाले होते. त्यापैकी एका लहान बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आज (दि. 4 डिसेंबर) या बालकाच्या वाडिलाचाही नायर रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्याने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. याचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले आहे.

हे ही वाचा -Gas Cylinder Explosion : वरळीत गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जखमींपैकी दोन गंभीर

बालक, वडिलांचा मृत्यू -

वरळी बीडीडी चाळीत ( BDD Chawl Worli ) मंगळवारी सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट ( Gas Cylinder Blast ) झाला. या स्फोटात एकाच कुटूंबातील आनंद पुरी (वय 27 वर्षे), मंगेश पुरी (वय 4 महिने), विद्या पुरी (वय 25 वर्षे), विष्णू पुरी (वय 5 वर्षे), असे चार जण जखमी झाले. या जखमींना नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जीपणा करण्यात आला. हा प्रकार समोर येताच मंगेश पुरी ( वय 4 महिने), विद्या पुरी (वय 25 वर्षे), विष्णू पुरी (वय 5 वर्षे) यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच रात्री मंगेश पुरी या 4 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. आनंद पुरी हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावरनायर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी 9.45 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा- सिलिंडर स्फोटातील रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई, खात्यांतर्गत चौकशीचे आदेश

2 डॉक्टर व 1 नर्स निलंबित -

नायर रुग्णालयात पुरी कुटूंबावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्याने उप अधिष्ठाता यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. 2 डॉक्टर व 1 नर्स यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली तीन डॉक्टरांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचेपडसाद स्थायी समितीत तसेच पालिका सभागृहात उमटले आहे. स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य समितीतून भाजपच्या 11 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. पालिका सभागृहात या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आपसात भिडले आहेत.

हे ही वाचा- Worli Gas Cylinder Blast : वरळीतील गॅस सिलेंडर स्फोटात लहान बाळाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details