मुंबई - भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी (Threatening to Kill) देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीला माहिम (Mahim) येथून अटक करण्यात आली आहे. ओसामा शमशद खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ओसामावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
- आशिष शेलार यांनी पोलिसात दिली होती तक्रार -
आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत होती. ओसामा त्यांना धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली होती. दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती आशिष शेलार यांनी पोलिसांना केली होती. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक नऊने तपास करून ओसामाला माहिम येथून अटक केली आहे.
- ...म्हणून देत होता धमकी -