महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Honey Trap Case : आमदार मंगेश कुडाळकरांना अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्याला राजस्थानमधून अटक - शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर ब्लॅकमेल प्रकरण

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना फोन वरून पैशाची मागणी करण्यात आली होती. कुडाळकर यांनी त्वरित सायबर सेलकडे याची तक्रार केली. पोलिसांनी ऑनलाइन पैसे टाकायला सांगीतले. त्यावरून आरोपीला ट्रॅक करणे सोपे झाले. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या टीमने सिकरी, राजस्थान येथून एका मोसमुद्दीन खान (वय 33) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस तपास करून आणखी काही आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे.

आरोपी
आरोपी

By

Published : Nov 23, 2021, 8:38 PM IST

Updated : Nov 23, 2021, 8:55 PM IST

मुंबई -हनी ट्रॅपच्या माध्यमातून (Honey Trap Case) शिवसेना आमदाराला पैशाचा गंडा घालणाऱ्याला मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber ​​Police) राजस्थानमध्ये जाऊन अटक केली आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Shiv Sena MLA Mangesh Kudalkar) यांना फोन वरून पैशाची मागणी करण्यात आली होती. कुडाळकर यांनी त्वरित सायबर सेलकडे याची तक्रार केली. पोलिसांनी ऑनलाइन पैसे टाकायला सांगीतले. त्यावरून आरोपीला ट्रॅक करणे सोपे झाले. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या टीमने सिकरी, राजस्थान येथून एका मोसमुद्दीन खान (वय 33) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस तपास करून आणखी काही आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे.

अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्याला राजस्थानमधून अटक



माझ्या सोशल मीडियाचे सर्व अकाउंट हॅक करून माझ्या फोटोचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न सुरु होता. हे माझ्या वेळीच लक्षात आले. तसेच सदर टोळी ही अशाच प्रकारे समाजातील प्रतिष्ठत व्यक्तींना, सामान्य नागरिकांनाही त्रास देत असल्याचे दिसून आले. याकरिता मी पुढाकार घेऊन अशा समाजात खोटी माहिती पसरवणारी फसवणारी टोळी उघडकीस यावी, याकरिता त्यांच्या विरुद्ध पोलीस सायबर क्राईम ब्रांच, बिकेसी, बांद्रामध्ये तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी खूप उत्तम प्रकारे तपास केला आणि टोळीच्या काही म्होरक्याना राजस्थान येथून अटक केली आहे व बाकीच्याना लवकरच अटक होईल, अशी प्रतिक्रिया कुडाळकर यांनी दिली आहे. अनोळखी व्यक्तीची मैत्री झाल्यावर लगेच त्यांना आपली खासगी माहिती देऊ नका, असे आवाहन मुंबई सायबर सेल पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केले आहे.

हेही वाचा -Money Laundering : ऋषिकेश देशमुखची सक्रियता, ईडीचे प्रतिज्ञापत्र!

Last Updated : Nov 23, 2021, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details