महाराष्ट्र

maharashtra

Mamata Banerjee letter to CM : राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी विरोधकांना लिहिलेल्या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढल्या अडचणी?

By

Published : Jun 13, 2022, 7:33 PM IST

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या सोबत असल्याने ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी 15 जूनला दिल्लीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. सर्व विरोधकांना भाजपच्या विरोधात एकत्र यावे लागणार असल्याने येणार्‍या काळात ही अडचण मुख्यमंत्र्यांच्या समोर राहणार नसल्याचे विश्लेषक सांगत आहेत. ( Mamata Banerjee letter to CM uddhav thackeray ) ( Presidential Election meeting ) ( Opposition Leader Meeting on Presidential Election )

Mamata Banerjee letter to CM
ममता बॅनर्जी यांचे विरोधकांना पत्र

मुंबई -ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी 15 जूनला दिल्लीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक ( Opposition leaders meet in Delhi ) बोलावली. मात्र बैठकीच्या पत्रामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ( Mamata Banerjee letter to CM uddhav thackeray ) आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या सोबत असल्याने ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या ही अडचण वाटत असली तरी, येणार्‍या काळात सर्व विरोधकांना भाजपच्या विरोधात एकत्र यावे लागणार असल्याने येणार्‍या काळात ही अडचण मुख्यमंत्र्यांच्या समोर राहणार नसल्याचे विश्लेषक सांगत आहेत.

कॉंग्रेसची आणि ममतांची बैठक एकाच दिवशी - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. 18 जुलैला ही निवडणूक होणार आहे. यासाठी मतमोजणी 21 जुलैला होणार असून 25 जुलैला नव्या राष्ट्रपतीचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांमध्ये सध्या दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने देशातील सर्व विरोधकांना 15 जूनला दिल्लीमध्ये विरोधी नेत्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आला आहे. तर त्याच दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील दिल्लीमध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षाने बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांमध्ये दोन गट पाहायला मिळत आहेत. मात्र ममता बॅनर्जी आणि काँग्रेसकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीमुळे राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेची मात्र कोंडी होत असलेली पाहायला मिळतेय.

ममता बॅनर्जी यांचे पत्र

ममता बॅनर्जी यांचे विरोधकांना पत्र -15 जूनला दिल्लीमध्ये बैठकीला यावे या बाबतचा सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काही विरोधी नेत्यांना पत्र लिहिले आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्रानंतर विरोधकांमध्ये काहीसा गोंधळ झाला आहे. त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील दिल्लीमध्ये याबाबतची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीवरून विरोधकांमध्ये दोन गट पडले आहेत का अशा प्रकारच्या चर्चा देशभर रंगले आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांची ही भूमिका एकतर्फी असल्याची टीका कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे.

हेही वाचा -Opposition unity on Presidential polls in jeopardy : राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या ऐक्याला धोका, ममतांची वेगळी बैठक

ममता दीदींच्या पत्रामुळे मुख्यमंत्री अडचणीत -मात्र या पत्रामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र हे पत्र मुख्यमंत्र्यांना मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौरा असल्याचे कारण देत ते दोघेही या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही तसेच मुख्यमंत्री यांचे नियोजित दौरा असल्यामुळे उपस्थित राहू शकणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ममता बॅनर्जी यांना कळवल आहे. मात्र असं असलं तरी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत घेतलेली भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अगदी कौटुंबिक संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हे संबंध जोपासण्याचा दोन्ही कडून प्रयत्न झाला. शिवसेना भारतीय जनता पक्ष सोबत राज्यात आणि केंद्रात कडे सत्तेत असतानाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ठाकरे कुटुंब नेहमीच एकमेकाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे या भूमिकेचा फटका महा विकास आघाडी सरकारला बसेल. ममता बॅनर्जी याच्या विरोधात ही भूमिका घेताना मुख्यमंत्र्यांना सावध पवित्रा ठेवावा लागणार आहे. आताही ममता बॅनर्जी यांना नकार करताना नियोजित काम आणि आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कारण त्यांना पुढे करावा लागल आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या मुद्यावर मुख्यमंत्री यांची डोकेदुखी अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्द्यावर शिवसेनेचे नेते मंडळीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

ममता बॅनर्जी आणि ठाकरे कुटुंबियांचे राजकारणा पलीकडचे संबंध -ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबांचे नेहमीच जवळचे संबंध पाहायला मिळाले आहेत. नेहमीच बंगालची वाघीण म्हणून ठाकरे कुटुंबियांकडून ममता बॅनर्जी यांचा उल्लेख होतो. केंद्र सरकारच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भूमिकेचे नेहमीच समर्थन ठाकरेंकडून केले जाते. 30 नोवेंबर 2021ला ममता बॅनर्जी या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी आवर्जून आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव त्यावेळेस त्यांना भेटू शकले नाही. मात्र आदित्य ठाकरे यांच्यामार्फत आपला संदेश त्यांनी ममता बॅनर्जी पर्यंत पाठवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबतही ममता बॅनर्जी नेहमीच आदराने बोलताना पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे अशा कौटुंबिक संबंध आला ममता बॅनर्जी यांनी घेतलेली राजकीय भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीशी अडचणीची ठरणारी आहे.

काँग्रेस वगळता विरोधकांची मोट बांधण्याचा ममतादीदीचा प्रयत्न -राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याचे काम ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरू झाला आहे. मात्र काँग्रेस वगळता सर्व विरोधकांनी एकत्र यावे यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी पत्र दिला आहे. मात्र काँग्रेस वगळता विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन दर्शवला त्याचा फटका मुख्यमंत्र्यांना राज्यात बसणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांच्याशी दोन हात दूर राहण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताना दिसतील.

काँग्रेस शिवाय भाजपपुढे आव्हान अशक्य - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना 15 जून रोजी दिल्लीला बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. तरी ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेली ही मोहीम प्राथमिक टप्प्यात आहे. या बैठकीला काही नेते उपस्थित झाले तरी पुढे जाऊन 2024 च्या लोकसभा निवडणूक हेच या नेत्यांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे काँग्रेस वगळता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सक्षम नेतृत्व उभा केले जाऊ शकत नाही याची कल्पना q सर्व नेते मंडळींना आहे. सध्या काही नेते ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला गेले तरी पुढे जाऊन काँग्रेस सोबत राष्ट्रपती निवडणूक असेल किंवा 2024 च्या लोकसभा निवडणुका असतील यासाठी सर्वांना एकत्र यावच लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता जरी वाईट वाटत असली तरी येणाऱ्या काळात भाजपाच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र यावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर या अडचणी राहणार नाहीत असं मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेस वगळता देशभरात विरोधकांची मौत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सक्षम पणे बांधता येणार नाही याची कल्पना खुद्द ममता बॅनर्जी यांना देखील आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व विरोधकांना एकत्र बसूनच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पर्याय उभा करावा लागेल असेही मत विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.

काँग्रेस वगळता विरोधकांची मोट बांधण्यासाठी केसीआर यांचा पुढाकार -भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. 2024 च्या लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येत भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय द्यायला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहे. मात्र काँग्रेस बघता विरोधकांनी एकत्र यावे यासाठी त्यांनी पुढाकार त्यांनी हि घेतला होता.

हेही वाचा -Uddhav Thackeray : राष्ट्रपतीपद निवडणूक.. ममता बॅनर्जींची बैठक.. उद्धव ठाकरे फिरवणार पाठ

ABOUT THE AUTHOR

...view details