महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mamata Banerjee in Mumbai : ममता बॅनर्जींनी सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन; 'ही' केली प्रार्थना - पश्चिम बंगाल मुख्यमंत्री आदित्य ठाकरे भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर जात आहेत. भेटीदरम्यान त्यांनी प्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. 26/11 च्या हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची ( TMC chief meet with Aditya Thackeray ) भेट घेणार आहेत.

ममता बॅनर्जींनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
ममता बॅनर्जींनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By

Published : Nov 30, 2021, 6:57 PM IST

Updated : Nov 30, 2021, 7:32 PM IST

मुंबई - तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या मुंबई विमानतळावर उतरल्या आहेत. त्यांनी मुंबईत आल्यानंतर प्रथम सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन ( Mamata Banarji Siddhivinayak Darshan in Mumbai ) घेतले आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात त्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर ( Mamata Banerjee three visits tour in Mumbai ) जात आहेत. भेटीदरम्यान त्यांनी प्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. 26/11 च्या हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत.

ममता बॅनर्जीं सिद्धीविनायकाचे दर्शन घेताना

हेही वाचा-Mamta Banerjee Mumbai Visit : उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट नाहीच, आदित्य ठाकरेंची घेणार भेट

ममता बॅनर्जी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( TMC chief meet with Aditya Thackeray ) यांची भेट घेऊ शकतात. वास्तविक, आरोग्यदायी कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हेही वाचा-Anil Deshmukh : अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर कुटुंबासह दाखल

उद्या शरद पवार यांची घेणार भेट
ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊ शकतात. यादरम्यान हे दोन्ही नेते अनेक मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. ममता बॅनर्जी 1 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन (वायपीओ) समिटमध्येही सहभागी होणार आहेत. यादरम्यान त्या उद्योगपतींसोबत बैठका घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार आहेत. वेळापत्रकानुसार ममता बॅनर्जी मुंबईत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून पूर्ण अंतर ठेवले आहे.

हेही वाचा-Winter Session of Parliament : विरोधकांचा गोंधळ; लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित

उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली व्हावी, यासाठी ही प्रार्थना

माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी ( West Bengal CM Visit Siddhivianayk Temple ) म्हणाल्या, की मी खूप वेळा मुंबईला आले. पण, सिद्धिविनायकचे दर्शन घ्यायला मिळाले नव्हते. एकदा तरी सिद्धीविनायक मंदिरात जाण्याची माझी इच्छा आहे. आमच्या येथेही मोठ्या प्रमाणात गणपतीची पूजा केली जाते. मी महाराष्ट्र सरकारचे आभारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Mamata Banerjee on Uddhav Thackerays health ) यांची प्रकृती चांगली व्हावी, यासाठी ही प्रार्थना केली आहे. यावेळी जय मराठा आणि जय बांगला, यांनी घोषणा दिली आहे.

Last Updated : Nov 30, 2021, 7:32 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details