महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत मॉल सुरू; मॉल्सच्या शहरात लगबग वाढली - मुंबई मॉल ताज्या बातम्या

केंद्र आणि राज्य सरकारच्या 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत टप्प्याटप्प्याने पुन्हा व्यवहार हळूहळू सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, आजपासून मॉल सुरु करण्यात आले आहेत.

मॉल
मॉल

By

Published : Sep 2, 2020, 10:06 PM IST

नवी मुंबई - 'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत बुधवारपासून नवी मुंबई शहरातील मॉल सुरु झाले आहेत. त्यामुळे जवळजवळ सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा मॉलचे शहर असलेल्या नवी मुंबईत लगबग वाढली आहे. मॉल व्यवस्थापनही सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत असून ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मॉल व्यवस्थापकांची प्रतिक्रिया
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील मॉलसह इतर व्यवहार मार्च महिन्यापासून ठप्प झालेले होते. कोरोनाची वाढती संख्या पाहता संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी यांनी मार्चमध्ये पहिली टाळेबंदी घोषीत केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती पुढे वाढत गेली. त्यामुळे कित्येक लोकांना रोजगार गमवावे लागले, तर काहींचा व्यापार धोक्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत टप्प्याटप्प्याने पुन्हा व्यवहार हळूहळू सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, आजपासून मॉल सुरु करण्यात आले आहेत.

हेही वाचा -...तर पुरामध्ये एवढे नुकसान झाले नसते, फडणवीसांची सरकारवर टीका

सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरात असलेला ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल, वाशी येथील रघुलीला, इनॉर्बिट तसेच विविध मॉल सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही विशेषत: युवावर्गात मॉल कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, मॉल सुरु झाल्यानंतर येथे गर्दी होऊ नये यासाठी मॉल व्यवस्थापनानेही विविध उपाययोजना केल्याचे निदर्शनास आले आहे. सीवूड्स ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल येथेही विविध उपाययोजना करण्यात आल्या असून मॉलमधील प्रवेशद्वारापासून ते ग्राहक बाहेर पडेपर्यंत सोशल डिस्टन्सिंग राखण्याबाबतची खबरदारी घेण्यात आल्याचे दिसत आहे. प्रवेशद्वारावर जंतुनाशकांची व्यवस्था, तसेच प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी, लिफ्टमध्ये चौघांनाच प्रवेश असणार आहे.

हेही वाचा -पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवरून संदीप देशपांडे यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details