मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबार 2020 पासून नियमित सुनावणी सुरू आहे. त्याची दुसरी सुनावणी आज (शनिवारी) विशेष एनआयए न्यायालयात घेण्यात आली. १९ डिसेंबरला सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना आता ०४ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच पुढील सुनावणी होईल असे न्यायालयाने म्हटले आहे. सात आरोपींपैकी केवळ चार आरोपी आज न्यायालयात सुनावणीवेळी हजर होते.
या नियमित सुनावणीसाठी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिवेदी, अजय राहीलकर व संदीप डांगे यांना अटक करण्यात आली होती.