मुंबई :नाशिक जिल्ह्यातील मालेगावला 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.30 च्या जवळपासबॉम्बस्फोटझाला होता. या प्रकरणाला आज 14 वर्ष पूर्ण झाली (Malegaon blast case completes 14 years today) आहे. या स्फोटामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता, तर या स्फोटामध्ये 101 जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास मालेगाव पोलीस करत होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसकडे हा तपास वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर हा पुन्हा तपास राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाचा खटला मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये सुरू (Malegaon blast case)आहे.
14 वर्षे पूर्ण झाली, खटला अद्यापही निकाली -सर्वोच्च न्यायालयाने खटला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र तरी देखील अद्यापही या खटल्याचा निकाल लागला नसून ट्रायल सुरू आहे. या प्रकरणी 495 साक्षीदारांना आरोपींविरोधात तपासण्यात येणार असल्याचे सुरुवातीला एनआयएने म्हटले होते. जुलै महिन्यात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 256 साक्षीदार तपासले असून आणखी 218 साक्षीदार तपासायचे असल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले होते. परंतु गेल्या जुलै महिन्यापासून आतापर्यंत केवळ 15 साक्षीदार तपासण्यात आल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. त्यावर जुलै महिन्यातील प्रतिज्ञापत्रात आणखी 218 साक्षीदार तपासण्याचे नमूद करण्यात आले असले, तरी एवढे साक्षीदार तपासले जाणार नसल्याचा दावा एनआयएतर्फे करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत खटल्यात 271 साक्षीदार तपासण्यात आले असून त्यापैकी 26 साक्षीदारांनी साक्ष फिरवली आहे. हा एक गंभीर खटला आहे आणि 14 वर्षे पूर्ण झाली, तरी खटला कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेला नाही. याउलट निम्म्या आरोपींची सुटका झाल्याचे कुलकर्णी याने न्यायालयाला सांगितले. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटला, समझौता बॉम्बस्फोट खटला, अजमेर बॉम्बस्फोट खटला कधीच निकाली निघाले. परंतु हा खटला अद्यापही निकाली निघालेला नसल्याचे कुलकर्णी याने सांगितले.
एकूण 12 आरोपींवर गुन्हा, 2 आरोपी फरार -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण 12 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दहा आरोपींना तपास एजन्सीकडून अटक करण्यात आली होती, तर दोन आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपींना तपास एजन्सी अद्यापही शोधू शकले नाही. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी पाच आरोपींना खटल्याची ट्रायल सुरू होण्यापूर्वी आणि आरोप निश्चित करण्यापूर्वी दोष मुक्त करण्यात आले होते. तर उर्वरित अटकेत असलेले पाच आणि फरार असलेले दोन या आरोपींविरोधात विशेष NIA कोर्टामध्ये खटला सुरू आहे. या प्रकरणातील पाच आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे.
साक्षीदार फितूर -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएकडून 495 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत 271 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे, तर या प्रकरणातील 26 साक्षीदार फितूर झाले आहे. या प्रकरणात भारतीय सेवा दलामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. फितूर साक्षीदारांमध्ये सर्वाधिक साक्षीदार हे आरोपी प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण एकूण 446 साक्षीदार नोंदविण्यात आले होते. मात्र यामधील शंभरहून अधिक साक्षीदारांचा जबाब कोर्टासमोर नोंदवण्यात येणार (Malegaon blast case completes 14 years) नाही.