पनवेल - अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीचा अपघात झाला ( Malaika Arora Car Accident ) आहे. पनवेल नजीक सायंकाळी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मलाइका अरोरा यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून जात असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन/चार गाड्यांना धडक दिली.
राज ठाकरे यांची आज मुंबईत सभा होत आहे. या सभेला काही मनसेचे पदाधिकारी मुंबई कडे निघाले होते. तेव्हा पनवेल जवळ मलाइका अरोरा यांच्या गाडी वरील चालकाचा ताबा सुटला. या घटनेत मलाइकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. मलाइकाला मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.