महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde Twitter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करणं भोवलं; तक्रारीनंतर ट्विटर अकाउंट सस्पेंड - Eknath Shinde Twitter

Eknath Shinde Twitter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या विरोधात Cyber Police सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवा सेनेचे सचिव किरण साळवी यांनी तक्रार दाखल केली असून @bhujangashetti या ट्विटर हँडलच्या चालकावर आयपीसी कलम 153(अ), 500, 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर @bhujangashetti या नावाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

Eknath Shinde Twitter
Eknath Shinde Twitter

By

Published : Oct 16, 2022, 6:23 PM IST

Updated : Oct 16, 2022, 7:00 PM IST

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या विरोधात Cyber Police सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवा सेनेचे सचिव किरण साळवी यांनी तक्रार दाखल केली असून @bhujangashetti या ट्विटर हँडलच्या चालकावर आयपीसी कलम 153(अ), 500, 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर @bhujangashetti या नावाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

Eknath Shinde Twitter

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी साळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, @bhujangashetti या ट्विटर हँडलद्वारे मी समाजात असंतोष निर्माण होईल. या उद्देशाने ११ ते १४ ऑक्टोबर 2022 दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर ट्विट केला आहे. याबाबत माहिती देताना साळी पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यांना कठोर कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल, समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे.

Eknath Shinde Twitter

कठोर कारवाई करण्याची मागणीसायबर पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र साळी याने शिंत्रे यांना दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंत्रे यांनी दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Last Updated : Oct 16, 2022, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details