मुंबईजगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबईमध्ये पहिला मार्च २०२० मध्ये आढळून Mumbai corona variant आला. गेल्या अडीच वर्षात मुंबईत कोरोना विषाणूच्या ४ लाटा आल्या. या चारही लाटा रोखण्यात पालिकेच्या आरोग्य विभागावर यश आले आहे. या अडीच वर्षाच्या कालावधीत मुंबईत कोरोनाच्या १७ व्हेरियंट आणि सब व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रोन या तीन व्हेरियंटचा सर्वाधिक प्रसार झाला Mumbai corona update होता.
Corona Variants in Mumbai मुंबईत गेल्या अडीच वर्षात या ३ व्हेरियंटमुळे कोरोनाचा सर्वाधिक प्रसार - Corona Variants in Mumbai
मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा प्रसार आहे, तो किती प्रमाणात आहे यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या Genome Sequencing Test करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून Mumbai corona situation आला. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात एकूण ११ लाख ३३ हजार ५०४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ८ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसारमुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून Mumbai corona situation आला. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात एकूण ११ लाख ३३ हजार ५०४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ८ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. या पहिल्या लाटेत दिवसाला सर्वाधिक २८०० रुग्णांची नोंद झाली. जून २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजार, डिसेंबर २०२१ मध्ये तिसऱ्या आलेल्या तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार तर जून २०२२ मध्ये आलेल्या चौथ्या लाटेत २३०० अशी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
या १७ व्हेरियंटचे मुंबईमध्ये रुग्णमुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा प्रसार आहे, तो किती प्रमाणात आहे यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या Genome Sequencing Test करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये पहिल्यांदा या चाचण्या करण्यात आल्या. त्यात कोरोना, अल्फा, केपा, नाइंटिन ए, द्वेन्टि ए, डेल्टा, डेल्टा डेरिव्हेटिव्ह, ओमायक्रोन, स्टेल्थ बी 2, ओमायक्रोनचे उपप्रकार असलेल्या BA २.७४, BA २.७५, BA २.७६, BA २.३८, BA ५ , BA २.३८.१, BA ४ या व्हेरियंटचेही रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या अडीच वर्षात मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या तब्बल १७ व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रोन या विषाणूंमुळे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक झाला आहे.
मुंबई महापालिका सज्जओमायक्रोनच्या Omicron BA व्हेरियंटचे रुग्ण corona cases in Mumbai आढळून येत आहेत. या व्हेरियंटच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. ओमायक्रोनमुळे तिसरी लाट आली होती. तिसऱ्या लाटेवर मात केली आहे. यामुळे या व्हेरियंटसाठी वेगळी काही तयारी करावी लागलेली नाही. तिसऱ्या लाटेत जी यंत्रणा होती ती आजही आहे. यामुळे ओमायक्रॉनच्या बी ए व्हेरियंटला रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज आहे. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या विमानतळावर चाचण्या केल्या जात आहेत. तसेच नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात वॉर्ड आणि खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती गोमारे यांनी दिली.
११७ वेळा शून्य मृत्यूची नोंदमुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
जिनोम सिक्वेन्सिंग कामुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत याची माहिती मिळवण्यासाठी पॉजिटीव्ह रुग्णांचे नमुने घेऊन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातात. कोरोना पॉजिटीव्ह तसेच जे रुग्ण लवकर बरे होत नाहीत अशा रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांसाठी पाठवले जातात. यामुळे रुग्णांना नेमका कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग आहे याची माहिती मिळते. अशी माहिती मिळाल्याने रुग्णांवर वेळीच उपचार करता येतात. तसेच एखाद्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यास त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
अडीच वर्षात या व्हेरियंट, सब व्हेरियंटचा प्रसार कोरोना अल्फा, केपा,नाइंटिन ए,द्वेन्टि ए,डेल्टा,डेल्टा डेरिव्हेटिव्ह,ओमायक्रोन,स्टेल्थ बी 2,ओमायक्रोन BA २.७४,ओमायक्रोन BA २.७५,ओमायक्रोन BA २.७६ ,ओमायक्रोन BA २.३८ ,ओमायक्रोन BA ५ , ओमायक्रोन BA २.३८.१ ,ओमायक्रोन BA ४ या व्हेरियंटचा सर्वाधिक प्रसार झाला आहे.