महाराष्ट्र

maharashtra

लोकल ट्रेनचा देखभाल-दुरुस्ती नवे दोन कारशेड उभारणार; भूसंपादनासाठी निविदा निघाल्या !

उपनगरातील वाढत्या लोकसंख्येमुळे (The growing population) सार्वजनिक वाहतुकीवर (Public transport) ताण येत आहे. उपनगरीय लोकलची (Suburban Local) देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कारशेडवर येणारा भार कमी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (Mumbai Railway Development Corporation) कडून भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवर वाणगाव येथे नवीन कारशेड उभारण्यात येणार आहे.यासाठी निविदा निघाल्या (Tenders have been issued) आहेत

By

Published : Dec 11, 2021, 6:11 PM IST

Published : Dec 11, 2021, 6:11 PM IST

लोकल ट्रेन  नवे दोन कारशेड
local trains

मुंबई: सध्या उपनगरीय लोकल ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे सहा कारशेड आहेत.ज्यामध्ये मध्य रेल्वेवर कुर्ला, कळवा आणि सानपाडा हे तीन कारशेड आहेत. तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार हे तीन कारशेड आहे. मात्र, कारशेडमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोकलची देखभाल दुरुस्ती होते. मध्य रेल्वेकडे 155 आणि पश्चिम रेल्वेकडे 110 लोकल असून या सहा कारशेडमध्ये त्यांची देखभाल, दुरुस्ती, तपासणी केली जाते. त्यामुळे या सहाही कारशेडवर मोठ्या प्रमाणात लोकल ट्रेनचा देखभाल दुरुस्ती मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अत्याधुनिक साेयी-सुविधा युक्त कारशेड उभारण्याची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये तयार करण्यात आला हाेता. त्यानुसार नवीन कारशेड उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील पालघर येथील वाणगाव आणि मध्य रेल्वेवरील कर्जत येथील भिवपुरी या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या नव्या दोन कारशेड (two new car sheds In mumbai) तयार झाल्यानंतर सहा कारशेडवरील येणार ताण कमी होणार आहे. वाणगाव ३५ हेक्टर आणि भिवपुरीसाठी ५५ हेक्टर जागेवर हे नवीन कारशेड उभारण्यात येणार आहे. सध्या भूसंपादनासाठी निविदा काढण्यात (Tenders have been issued) आल्या आहे. भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. हे कारशेड हायटेक व जास्त लोकल उभ्या राहू शकतील, त्यांची तपासणी, दुरुस्ती योग्य प्रकारे करता येईल, अशाप्रकारे बनविण्याची योजना आखली आहे. या दोन्ही कारशेडमध्ये 80 ते 100 लोकलची एकाचवेळी देखभाल, दुरुस्ती करणे शक्य होणार असल्याची माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details