महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mahesh Tapase Letter To PM Modi : 'राज्य सरकार आणि मनपाच्या बसेसना डिझेल दरवाढीतून सूट देण्यात यावी' - डिझेल दरवाढीवरुन पंतप्रधानांना पत्र

रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असे महेश तपासे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांचा संग्रहित छायाचित्र
पंतप्रधानांचा संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 21, 2022, 7:56 PM IST

मुंबई -देशातील राज्य सरकार आणि महापालिका परिवहन बसला डिझेल दरवाढीतून सूट देण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असे महेश तपासे यांनी निवेदनात म्हटले आहे.

महेश तपासेंनी पंतप्रधानांना पाठविलेले पत्र
घाऊक डिझेल खरेदी करणारे कंपन्यांकडून आता थेट इंडियन खरेदीची ऑर्डर दिली जात नसून पेट्रोल पंपांवर बसेस आणि मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. याचा ताण सामान्य ग्राहकांना देखील सोसावा लागतो. त्यामुळे पेट्रोल पंपावरील ताण देखील वाढला असल्याचे महेश तपासे यांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details