मुंबई -मुंबै बँकेंच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ( Mumbai Bank President Election ) महाविकास आघाडीने भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या ( Bjp Pravin Darekar ) गडाला सुरुंग लावला आहे. दरेकर यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेत प्रसाद लाड ( Mumbai Bank Prasad Lad ) यांना उमेदवारी दिली. मात्र, सदस्य संख्याबळाच्या जोरावर बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची ( Mumbai Bank President Siddharth Kamble ) निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाची निवड चुरशीची झाली. शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मते मिळाली. अखेर भाजपच्या विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लागली.
गेल्या अनेक वर्षापासून प्रवीण दरेकर यांच्याकडे मुंबै बँकेची सुत्रे हाती होती. दरेकर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने युती करत व्यूहरचना आखली. सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते मिलींद नार्वेकर आणि सुरज चव्हाण यांच्या चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
उपाध्यक्षपदी भोसले