मुंबई -18 जुलैला होणार्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या ( Presidential election ) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील ( Mahavikas Aghadi )आमदारांची आणि नेत्यांची महत्वाची बैठक 17 जुलैला होणार होती. यशवंतराव चव्हाण सेंटर ( Yashwantrao Chavan Center ) येथे ही बैठक पार पडणार होती. मात्र आता ही बैठक रद्द ( Meeting Canceled ) करण्यात आलेली आहे. महाविकासआघाडी मध्ये असलेल्या शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Presidential candidate Draupadi Murmu ) यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आमदारांच्या या बैठकीचे आयोजन रद्द केल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Senior Congress leader Balasaheb Thorat ) यांनी देखील शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती. तर शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी नेहमीच उमेदवार पाहून पाठिंबा देत असल्याची सारवासारव राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे.
यशवंत सिन्हा यांचा मुंबई दौरा रद्द -यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सेना हे देखील मुंबई दौऱ्यावर येणार होते. याबाबतचे वेळेचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर यशवंत सिन्हा यांचा मुंबई दौरा ही रद्द केला गेला असल्याची माहिती मिळत आहे. एन डी ए च्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू या 14 जुलैला मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार आणि शिंदे गटातील आमदारांच्या भेटी घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीबाबत चर्चा केली होती.