महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी होणार का? - मुंबई महापालिका निवडणूक 2022

महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आता सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही मोठ्या पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती सुरू केली आहे.

महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

By

Published : Feb 13, 2022, 7:51 PM IST

मुंबई - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी (Bmc Election 2022) आता चार प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार का? यासाठी तिन्ही पक्षामध्ये चलबिचल सुरू आहे.

नवाब मलिक प्रतिक्रिया
महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आता सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही मोठ्या पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती सुरू केली आहे. कोणत्या प्रभागात पक्षाचं प्राबल्य जास्त आहे. तसेच कोणत्या प्रभागांवर प्रभुत्व तयार करावे लागेल. यासाठी चारही पक्षाने आपल्या नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत.

काँग्रेसकडून मुंबईत बैठक
काँग्रेसकडून मुंबईच्या निवडणुकांबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील हे स्वतः उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील चार जानेवारीला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांची बैठक बोलावली होती. तर भारतीय जनता पक्षाने देखील मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी बैठकींचे सत्र सुरू केले आहे. तर तिथेच गेल्या पंचवीस वर्षापासून महानगरपालिकेवर शिवसेनेची असलेली सत्ता यावेळीही कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून कार्यक्रमांत सपाटा सुरू झाला आहे.

मनपा निवडणुकीत आघाडी होणार का?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. निवडणुका बाबतच्या घेतलेल्या आढावा बैठका नंतर महाविकास आघाडीतून निवडणुका लढवाव्यात यासाठी दोन्ही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बोलणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा "एकला चलो" नारा दिला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी बाबतची अद्याप कोणतीही बोलणी झालेली नाही. तसेच या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी भूमिका काँग्रेस नगरसेवक तसेच स्थानिक नेत्यांची आहे. याबाबत काँग्रेसकडून चाचपणीही सुरू असल्याचं भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेतून सांगितले. तर तेथेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होणार का? याबाबत शिवसेनेकडून चकार शब्दही काढला जात नाही. मात्र मुंबई महानगरपालिकेत आघाडीबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ आल्यावर घेतील अशी माहिती आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बाबत तिन्ही पक्षांची मते सध्या तरी वेगळीच असलेली पाहायला मिळत आहेत.

पंचवीस वर्षांपासून शिवसेनेती सत्ता

मुंबई महानगरपालिकेवर गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेवरचा वचपा काढण्यासाठी ही सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी यावेळेस भारतीय जनता पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शिवसेना यावेळी एक हाती सत्ता मिळवण्यासाठी काय रणनीती आखणार? किव्हा येणाऱ्या काळात शिवसेना महाविकास आघाडी बाबत नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे देखील लक्ष असणार आहे.
हेही वाचा -Hemanta Sarma vs Rahul Gandhi : असे काय म्हणाले हेमंत बिस्वा शर्मा? ज्यामुळे राजकारण तापलं, काँग्रेस आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details