मुंबई - महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद नेहमीच चव्हाट्यावर आले आहेत. आता विद्यापीठ प्रकुलगुरु नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (National Education Policy 2021) विरोधकांनी यावरून राळ उठवल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला. राज्यपालांचे अधिकार अबाधित राहतील असा दावा सामंत यांनी केला आहे.
सुधारणा विधेयक अधिवेशनात मांडणार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या प्रभावी अंमलबजावणी तसेच राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावणे, गुणवत्ता वाढवणे, त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने डॉ. सुखदेव थोरात माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari) या समितीच्या अहवालाच्या आधारे अधिनियमातील प्रस्तावित सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. (Appointment of University Vice Chancellor) राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जातील. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे प्र-कुलपती असतील. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. आगामी अधिवेशनात याबाबत सुधारणा विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) यांनी दिली आहे.