महाराष्ट्र

maharashtra

Mahavikas Aghadi Gov vs BJP : अखेर ठरले! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम

राज्यात महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi government ) सत्तेवर आल्यापासून केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या ( central government agencies ) कारवाया वाढल्या आहेत. अनेक नेते आणि मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत. सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. एकीकडे भाजपकडून दबाव टाकला जात असताना, अडचणीत असलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात राज्याचे गृहखाते कमी पडत ( image of the government igetting tarnished ) आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अशी खंत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( ShivSena party chief Uddhav Thackeray ) यांच्याकडे व्यक्त केली.

By

Published : Apr 1, 2022, 8:55 PM IST

Published : Apr 1, 2022, 8:55 PM IST

महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

मुंबई - भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत सरकारमधील नेत्यांवर छापेमारी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारनेदेखील या विरोधात आता दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी भाजपच्या एका नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये जोरबैठका सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या नेत्याचे नाव गुपित ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi government ) सत्तेवर आल्यापासून केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या ( central government agencies ) कारवाया वाढल्या आहेत. अनेक नेते आणि मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत. सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. एकीकडे भाजपकडून दबाव टाकला जात असताना, अडचणीत असलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात राज्याचे गृहखाते कमी पडत ( image of the government getting tarnished ) आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अशी खंत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shivsena party chief Uddhav Thackeray ) यांच्याकडे व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादीकडून गृहमंत्री खाते काढून सेनेच्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी लावून धरली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे थेट तक्रार केली.

त्यानंतर राज्यात सकाळपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. ही भेट नियोजित असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. अर्धा तास चाललेल्या या बैठकीत भाजपला प्रत्युत्तर देण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचे समजते.

कोण आहेत रडारवर?
महाविकास आघाडी सरकारमधील दोन नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या निशाण्यावर आहेत. अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांचा समावेश असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी कारवाई पूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने गोत्यात असलेल्या भाजपच्या नेत्यांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मोहित कंबोज, किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे सरकार कोणावर कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details