महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित - Maharashtra Political Crisis

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचे पडसाद ( Maharashtra Political Crisis ) मुंबई ते गुजरात, आसाम, दिल्लीपर्यंत पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत चाळीस आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सोबत 40 आमदार असतील तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊ शकेल. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. आज (दि. 22 जून) दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे.

महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

By

Published : Jun 22, 2022, 10:33 AM IST

मुंबई -महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचे पडसाद ( Maharashtra Political Crisis ) मुंबई ते गुजरात, आसाम, दिल्लीपर्यंत पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत चाळीस आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सोबत 40 आमदार असतील तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊ शकेल. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. आज दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ ( Congress Leader Kamal Nath ) हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकार विरोधात पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्र सरकार अस्थिर झाले आहे. महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाकडून ऑपरेशन लोटस ( Operation Lotus ) राबवले जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो. या बैठकीला काँग्रेसचे नेते ( Congress Leaders ) अशोक चव्हाण ( Ashok Chavan ), बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ), राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP Leaders ) अजित पवार ( Ajit Pawar ), जयंत पाटील ( Jayant Patil ), शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) हे देखील उपस्थित राहणार आहेत.

सरकार टिकवण्याचं आव्हान -मंत्रीएकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडाचा पवित्रामुळे सरकार अल्पमतात येईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व राजकीय परिस्थितीत नेमक काय निर्णय घ्यावे. यासाठी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकत्र येत सरकार वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. बुधवारी (दि. 22 जून) दुपारी ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -MLA Kailas Patil escape : ४ कि.मी अंतर पावसात भिजत कापले नंतर.. शिंदेंच्या तावडीतून निसटलेल्या आमदाराने सांगितली आपबिती

ABOUT THE AUTHOR

...view details