मुंबई - या महिन्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्त महाविकास आघाडीकडून यांच्या तयारीबाबत एक बैठक बोलावण्यात आली होती. बैठक बोलावल्या प्रमाणे महाविकास आघाडीचे नेते व मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहायला हवे होते. परंतु, या बैठकीला सुभाष देसाई सोडून अन्य कोणतेही नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे, महाविकास आघाडी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत काय भावना ठेऊन आहे हे कळते, यातूनच त्यांचे बाबासाहेबांवर असलेले प्रेम बेगडी असल्याचे दिसून येत असल्याची टीका, भाई गिरकर यांनी केली.
माहिती देताना भाजप नेते भाई गिरकर भाई गिरकर यांच्याकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, सत्तास्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री किंवा आघाडीचे नेते डॉ. राऊत वगळता कोणीही बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आले नाही. त्यामुळे, महापरिनिर्वाण दिनानिमित्त तरी मुख्यमंत्री अभिवादानासाठी येतील अशी अपेक्षा करू, असे भाई गिरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वर्षातून एकदा तरी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी जात होते. बाळासाहेबानंतरचे शिवसेना पक्षप्रमुख बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेलेले नाही. तसेच काँग्रेसचे नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कधी जात नाही. त्यांचे बेगडी प्रेम या ठिकाणी दिसून येते. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसने अडवणूक केली होती, असा आरोप गिरकर यांनी केला. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतून लोकसभेत पाठवण्यात अपयशी करण्यात काँग्रेसचा हात होता, असा आरोपही देखील गिरकर यांनी केला. फक्त आपल्या मनात बाबासाहेबांविषयी प्रेम आहे. शाहू, फुले यांच्या नावाने राजकारण करायचे आणि त्यांच्याबद्दल बेगडी प्रेम दाखवायचे हेच महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे, अशी टीका भाऊ गिरकर यांनी केली.
हेही वाचा-महिलांनी बलात्काऱ्यांना सहकार्य करावे; निर्मात्याची वादग्रस्त पोस्ट