मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणचा दौरा करून त्या भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागात अतोनात नुकसान झाले आहे. तीन दिवसापूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मुख्य बाजारपेठ आणि नागरी वस्तीत सहा ते सात फूट पाणी शिरले होते. आता परिस्थिती निवळली असली तरी, पूरानंतर सावरण्यासाठी नागरिकांना मदतीची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण दौऱ्यावर आले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून चिपळूणमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी, पीडितांशी साधला संवाद - रत्नागिरी अतिवृष्टीचा तडाखा
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी महाडमधील तळई दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री ठाकरे दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिपळूणला पोहोचून तिकडच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी महाडमधील तळई दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री ठाकरे दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिपळूणमध्ये पोहोचले आहेत. ते येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेणार आहेत.
असा असणार आहे मुख्यमंत्र्यांचा चिपळूण दौरा-
मातोश्री निवासस्थान येथून मुख्यमंत्री सकाळी 9.40 वाजता मुख्यमंत्री मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कलिना गेट नंबर 8 यथे पोहोचणार
- 10.00 वा. हेलिकॉप्टरने अंजनवेल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी कडे रवाना
- 11.00 वा. आर.जी.पी.पी.एल. हेलिपॅड, अंजनवेल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे आगमन
- 11.05 वा.मोटारीने चिपळूण, जि. रत्नागिरीकडे प्रयाण
- दुपारी 12.20 वा. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आगमन 12.20 वा. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे पूरग्रस्त भागाची पाहणी व आढावा बैठक
- दुपारी 01.20 वा. मोटारीने आर. जी. पी. पी. एल. हेलिपॅड, अंजनवेल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी कडे प्रयाण
- 02.35 वा. आर.जी.पी. पी. एल. हेलिपॅड, अंजनवेल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे आगमन
- 02.40 वा. हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, 03.40 वा छ.शि.म.आं. विमानतळ कलिना गेट नं 8 येथे आगमन
- 03.45 वा मोटारीने मातोश्री निवास्थानी रवाना
Last Updated : Jul 25, 2021, 2:53 PM IST