मुंबई - दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यावर सरकारचा भर आहे. प्राथमिक आरोग्यासाठी 5 हजार कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
महा'अर्थ': आरोग्य विभागासासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद
राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. नवीन २० डायलिसिस सेंटर सुरू करणार आहेत.
आरोग्य विभागासासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद
राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. नवीन २० डायलिसिस सेंटर सुरू करणार आहेत.
रुग्णांवर ९९६ प्रकारचे उपचार मोफत उपचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नव्या रुग्णवाहिकांसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. मानव विकास निर्देशांतर्गंत आरोग्यासाठी तालुक्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.