मुंबई -मान्सून पूर्व पावसाने मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरा (Suburban)त जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळी 8 वाजल्यानंतर वीजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसा (Rain)ने जोर धरला आहे. शहरातील दादर, प्रभादेवीस कुलाबा, वांद्रेसह पूर्व आणि पश्चिम उपगनगरात पावसाने दमदार संततधार सुरु ठेवली आहे. या पावसाने मुंबईतील उपनगरीय लोकल वाहतूक थोडीशी मंदावली आहे. काही मार्गावर लोकल गाड्या जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान खात्याने मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील 2-3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून - सुरवातीला कर्नाटकामध्ये आणि नंतर गोव्याच्या वेशीवर रेंगाळलेला मान्सून जोराचा दाखल झाला. सिंधुदुर्गात सर्च तालुक्यांत मान्सूनने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाबाबतही हवामान खाते आशावादी असून पुढील 2-3 दिवसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. येत्या 3-4 तासांत मुंबईउपगनगरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवला आहे.
दक्षिण रायगडात मान्सूनपूर्व सरी - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 13 ऑगस्ट रोजी जोराचा पाऊस कोकणात पडणार आहे. मात्र दक्षिण रायगडात आज संध्याकाळच्या सुमारास मान्सून पूर्व सरी बरसल्या. महाड, माणगाव परिसरात, पोलादपूर तालुक्यातील काही भागात, श्रीवर्धन, म्हसळा या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व सरी बरसल्या. या पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.