मुंबई -पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वादळ/विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने बुधवारी जाहीर केला. छत्तीसगडमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस होणार आणि 15-17 जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात तर 19 जून रोजी विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल झाला ( Maharashtra Monsoon Updates ) आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाल्याने राज्यात 5 दिवसांसाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. कोकणात पावसाची तीव्रता ही जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, गुरुवारी दिल्ली आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने बुधवारी माहिती दिली की उत्तर दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली (बवाना, मुंडका), सोनीपत, खारखोडाच्या (हरियाणा) निर्जन ठिकाणी आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येऊ शकतो. आयएमडीने म्हटले आहे की 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
२४ तासांत आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस -दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या (NCR) काही भागात गुरुवारी पहाटे पाऊस झाला. पावसामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरच्या लगतच्या भागात आहे. उत्तर अरबी समुद्राच्या मध्यभागी एक चक्रवाती परिवलन समुद्रसपाटीपासून 3.1 ते 5.8 किमीच्या दरम्यान उंचीसह नैऋत्येकडे झुकत आहे. अरबी समुद्रावरील चक्राकार चक्राकार परिवलनपासून ते ईशान्य अरबी समुद्र आणि कच्छमार्गे दक्षिण-पश्चिम राजस्थानपर्यंत पसरले आहे. त्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशपासून मणिपूरपर्यंत बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि आसामपर्यंत कमी दाबाची रेषा दिसू शकते. गेल्या २४ तासांत आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. गंगेच्या पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, छत्तीसगडचा काही भाग आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला.
२४ तासांत, आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता -तामिळनाडू, केरळ, उत्तर किनारपट्टी ओडिशा आणि सिक्कीममध्ये एक-दोन ठिकाणी जोरदार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडला. तेलंगणा, किनारी कर्नाटक, गुजरातचा काही भाग, ओडिशा, पूर्व राजस्थान, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडला. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण-पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, झारखंड, पूर्व बिहार, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर एक किंवा एका ठिकाणी हलका पाऊस झाला. उत्तर प्रदेशातील एक-दोन भागात उष्णतेची लाट दिसून आली आहे. पुढील २४ तासांत, आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज :भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
जून महिन्यात सरासरी पाऊस होण्याचा अंदाज-भारतीय हवामान विभागाकडून जून महिन्यात होणाऱ्या पावसाची सरासरीचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पूर्व भारत, मध्य भारत, हिमालय आणि मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता.
आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या -