मुंबई -राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात सूर्य आग ओकत होता. उष्णता वाढली होती. यामुळे लोकांनी घराबाहेर जाणे टाळले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशापेक्षा अधिक वाढले होते. विदर्भातील काही शहरांमध्ये ही अवस्था होती. आता 10 जूनला मॉन्सून केरळमध्ये धडकण्याचा ( Maharashtra weather forecast ) अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण त्या आधीच महाराष्ट्रात पाऊस आला आहे. लोकांना रखरखत्या उन्हापासून ( Weather Maharashtra News ) दिलासा मिळाला.
आगामी पाच दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये दाखल झाला (Maharashtra Monsoon Updates ) आहे.
मॉन्सून राज्यात दाखल झाल्याने कालपासून राज्यात येत्या 5 दिवसांसाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाची तीव्रता ही जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या.
मुंबई -27.6 अंश सेल्सियस
पुणे -24.6 अंश सेल्सियस