Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस सरीवर-सरी, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज - हवामान अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच २० आणि २१ ऑगस्ट रोजीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्यासंदर्भात अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई - जुलै महिन्यात तुफान बॅटिंग केल्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. बंगालच्या महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आजपासून पुढील तीन दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस बरसणार आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच २० आणि २१ ऑगस्ट रोजीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्यासंदर्भात अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. कोकण व मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील तीन आठवड्यानंतर पुन्हा जोरदार पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस कायम राहणार आहे.