मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून, हवामान विभागाने ( Meteorological Department ) ऑरेंज अलर्ट ( Orange Alert ) दिला आहे. मुसळधार ( IMD ) पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे बहुतांश ठिकाणी ( Farmers have Suffered Huge Losses ) मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे ( Heavy Rains in Mumbai ) शेतकऱ्यांसाठी आणखी पुढील 3 दिवस हे वैऱ्याचे आहेत. राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबईसह उत्तर कोकणामध्ये मुसळधार होण्याची शक्यता :हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासूनच मुंबई परिसरात पाऊस सुरू आहे. कल्याण, ठाणे भागात सकाळपासून जोरदार पाऊस आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात हलका ते हलका पाऊस पडला असून, बहुतांशी घाट भागात पाऊस झाला. पुढील ४ ते ५ दिवसांचा मान्सून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांसह महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. कोकणात सकाळपासून पाऊस सुरू आहे. ठाणे 27.0 मि.मी, रत्नागिरी 62.7 मि.मी, डहाणू 57.5 मि.मी, हर्णै ४७.० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत आज सकाळपासून पाऊस : राज्याच्या इतर भागांप्रमाणेच शनिवारी मुंबईच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. मुंबईमध्ये रिमझिम पाऊस झाला, तर उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय राहणार असून, त्याचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे. पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार ( Heavy rains in Sindhudurg ) पावसामुळे गडनदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गडनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक भागात पुराचे पाणी घुसलं आहे. कणकवली आचरा मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला. तर माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला महापूर आल्याने कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटलाय आहे.
उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता : सिंधुदुर्गात रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फटका कणकवली तालुक्यातील बावशी गावातील दशरथ मर्ये यांच्या कुटुंबाला बसलाय...सततच्या पावसामुळे मर्येंचं घर कोसळलंय...दैव बलवत्तर म्हणून मोठ्या संकटातून हे कुटुंब बचावलंय...या घरात लहान मुलगी आणि तिची आजी होती...मोठा आवाज येताच दशरथ मर्ये धावत त्या खोलीत आले आणि त्यांनी मुलीला आजीला बाहेर काढलं.