मुंबई : येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली ( Heavy Rain Alert Maharashtra ) आहे. काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अरबी समुद्रात रेंगाळले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सून थांबला ( Maharashtra Weather Forecast ) आहे.
..तरच मान्सूनला मिळणार बळकटी :उद्यापासून (दि. 8) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्व मोसमी पावसाचा उपयोग होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात थांबला आहे. त्याठिकाणी कारवार, चिकमंगलळूर, बंगळूर, धर्मापुरी दरम्यान स्थिर झाला आहे. कर्नाटकात रेंगाळलेल्या मान्सूनला बळकटी मिळाल्यास तो महाराष्ट्रात पुढील वाटचाल करेल.