महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra weather forecast : राज्यात 5 जुलैपासून चांगल्या पवासाची शक्यता, जाणून घ्या हवामान.. - Maharashtra rain news

येत्या 48 तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Maharashtra weather forecast
महाराष्ट्र हवामान

By

Published : Jul 3, 2022, 8:47 AM IST

मुंबई -मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. दरम्यान, येत्या 48 तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या.

प्रमुख शहरांचे तापमान -

मुंबई - 28 अंश सेल्सिअस

पुणे - 23 अंश सेल्सिअस

औरंगाबाद - 26.91 अंश सेल्सिअस

नागपूर - 25 अंश सेल्सिअस

नाशिक - 23.4 अंश सेल्सिअस

सोलापूर - 25.2 अंश सेल्सिअश

कोल्हापूर - 22.91 अंश सेल्सिअस

जळगाव - 26.2 अंश सेल्सिअस

ABOUT THE AUTHOR

...view details