मुंबई - मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. काल रत्नागिरी, दापोली सिंधुदुर्ग, गोवा येथे गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडला आहे. रायगड आणि कोंकणातही पाऊस पडला आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली. आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या.
प्रमुख शहरांचे तापमान -
मुंबई -28.6 अंश सेल्सियस
पुणे -26.4 अंश सेल्सियस
औरंगाबाद -32.61 अंश सेल्सियस