महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आघाडीतील 50 पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात - गिरीश महाजन - राजीनामा

आघाडीतील 50 पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. मात्र आम्ही सर्वांनाच पक्षात सामावून घेऊ शकत नाही, असेही महाजन म्हणाले आहेत.

आघाडीतील 50 पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात - गिरीश महाजन

By

Published : Jul 30, 2019, 5:48 PM IST

मुंबई -मंगळवारी कालिदास कोळंबकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

"बरेच लोक भाजपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 हून अधिक आमदार भाजपमध्ये येऊ इच्छितात. पण आपल्यालाही काही मर्यादा आहेत, आपण सर्वांनाच पक्षात सामील करू शकत नाही."

वाढत्या पक्षप्रवेशाची महाजन यांना चिंता ?

आघाडीतील 50 पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गोप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. आघाडीचे अनेक दिग्गज नेते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि भाजपत प्रवेश करत आहे. मात्र पक्षात सर्वांनाच प्रवेश दिला जाईल असे नाही. महाजन यांच्या या विधानामुळे भाजपमध्ये वाढत्या पक्षप्रवेशाची चिंता तर महाजन यांना सतावत नसेल ना? अशी शंका वाटत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details