महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विधानसभा निवडणुकीत 9 हजार 673 केंद्रातील मतदानाचे होणार लाइव्ह वेबकास्ट - विधानसभेतील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 9 हजार 673 केंद्रांतील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे.

मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट

By

Published : Oct 14, 2019, 11:42 AM IST

मुंबई -राज्यात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा... सत्ता आणि बहुमताची भाजपला मुजोरी, राज ठाकरे यांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग सेंटर) उभारण्यात येतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर 15 प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची विशेष काळजी घेण्यात येईल. वृध्द नागरिकांसाठी रॅम्प, मतदारांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

हेही वाचा... मुंबईचे डबेवाले लवकरच येणार ऑनलाईन अन्न पुरवठा सेवेत

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details