मुंबई - विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. बुद्धीबळाच्या लढतीमध्ये झालेल्या या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर बाजी मारली. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे ( Maharashtra vidhan parishad election vote count ) पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी ( Prasad Lad win ) झाले. तर, काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे ( Chandrakant Handore ) यांचा ( Maharashtra vidhan parishad election 2022 ) आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. निवडणुकीत उमेदवारांना ( vote count of candidates ) जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमुल्यांचा कोटा कसा पूर्ण झाला? याबाबत ( Maharashtra vidhan parishad election result ) जाणून घेऊया.
Vidhan Parishad election result : विधान परिषद निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली? जाणून घ्या.. - विधान परिषद निवडणूक निकाल
भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे ( Maharashtra vidhan parishad election vote count ) पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी ( Prasad Lad win ) झाले. तर, काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे ( Chandrakant Handore ) यांचा ( Maharashtra vidhan parishad election 2022 ) आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. निवडणुकीत उमेदवारांना ( vote count of candidates ) जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमुल्यांचा कोटा कसा पूर्ण झाला? याबाबत ( Maharashtra vidhan parishad election result ) जाणून घेऊया.
पहिल्या फेरीअखेर राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा) यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2700, उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर (शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमुल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.
दहाव्या व शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमुल्य, तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमुल्य मिळाली. या फेरीअखेर अधिक मतमुल्यांच्या आधारे जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.
हेही वाचा -MLC Result 2022 : काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव, भाई जगताप म्हणाले...