मुंबई : दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील टॅक्सींमध्येही जीपीएसवर चालणारे मीटर लावण्याचा विचार परिवहन विभाग करण्यात येत आहे. लवकरच त्यासाठी जीपीएस यंत्रणा हाताळणाऱ्या कंपन्यांकडून किंवा व्यक्तींना सादरीकरणासाठी परिवहन विभागात आमंत्रित केले जाणार आहे.
वेळेची बचत होणार..
राज्य सरकारने 1 मार्चपासून रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सीचे मीटर अपग्रेड करण्यासाठी चालकांची लगबग सुरू आहे. सध्या साडे चार लाख रिक्षापैकी फक्त 20 हजार 820 रिक्षा चालकांनी मीटर कॅलिब्रेशन केले आहे. तसेच, टॅक्सीच्या मीटरचे सुध्दा कॅलिब्रेशन सुरुवात झालेली आहे. मात्र टॅक्सी मीटरच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया वेळ खाऊ आहे. पुरेशी जागा आणि पर्याप्त मनुष्यबळ नसल्यामुळे परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात अडचणीला समोर जावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची टॅक्सी रिक्षा भाडेवाढ झाल्यास वेळेची बचत होण्याकरिता आणि जलद पद्धतीने टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन टॅक्सींमध्येही जीपीएसवर चालणारे मीटर लावण्याचा परिवहन विभागावाकडून विचार केला जात आहे.