महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 22, 2021, 12:46 PM IST

ETV Bharat / city

खुशखबर! आजपासून राज्यातील रिक्षा चालकांना मिळणार आर्थिक मदत

ज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही अडचणी आल्यास त्यांच्या मदतीसाठी परिवहन विभागाकडून १८००१२०८०४० हेल्पलाईन क्रमांक सुरू केलेला आहे. तसेच रिक्षा चालकांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्जदारांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक लिंकमध्ये द्यावा लागणार आहे. मात्र ज्या रिक्षा परवाना धारकांकडे आधार कार्ड नसेल, किंवा त्यावरील माहिती अद्ययावत केलेली नसेल, अशा परवाना धारकांनी थेट परवाना असलेल्या आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा

रिक्षा चालकांना मिळणार आर्थिक मदत
रिक्षा चालकांना मिळणार आर्थिक मदत

मुंबई - राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजूंना लॉकडाऊनमध्ये दिलासा मिळावा म्हणून शासनाने रिक्षा परवाना धारकांना दीड हजार रुपयांचे आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ही मदत देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अवघ्या २४ तासांत अर्जदार रिक्षा परवाना धारकांच्या बँक खात्यात ही मदत जमा होणार आहे. त्यासाठी रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

रिक्षाचालकांनो असा करा अर्ज-

कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. परिवहन विभागाने दिलेल्या https://transport.maharashtra.gov.inया लिंकवर क्लिक केल्यानंतर रिक्षा परवाना धारकांना रिक्षाचा वाहन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर परवानाधारक स्वतः अर्ज करत आहे की वारसदाराने अर्ज केला आहे, ती माहिती नमूद करावी लागेल. संबंधित माहिती भरल्यावर वाहन चालविण्याचा लायसन्स क्रमांक आणि आधार क्रमांक टाकताच अर्जदाराचा फोटो लिंकवर दिसेल. यामध्ये अर्जदाराच्या फोटोसह आरटीओचे नाव, अर्जदाराचा आधार क्रमांक, लायसन्स क्रमांक, अर्जदार प्रकार आणि अर्ज केल्याचा दिनांक वेळेसह स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर पुढील २४ तासांत परिवहन विभागाकडून अर्जदाराच्या माहितीची पडताळणी करून मदतीचे दीड हजार रुपये अर्जदाराच्या खात्यात वळते केले जातील.

रिक्षा चालकांना मिळणार आर्थिक मदत
परिवहन विभागाकडून आव्हान-परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, शासने घोषित केलेल्या आर्थिक मदतीपासून कोणत्याही रिक्षा चालक वंचित राहू नयेत, म्हणून परिवहन विभागाकडून ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती देण्यासाठी रिक्षा चालक व मालक यांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या संघटनाना ऑनलाईन सादरीकरण केले. या सादरीकरणात रिक्षा परवाना धारकांनी नेमकी कोणती माहिती भरायची? याचा प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच सर्व रिक्षा चालक व मालक यांच्या संघटनांनी त्यांच्या सदस्यांपर्यंत ही माहिती पोहचवण्यात यावी, असे आवाहन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.हेल्पलाईन क्रमांक सुरू-राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही अडचणी आल्यास त्यांच्या मदतीसाठी परिवहन विभागाकडून १८००१२०८०४० हेल्पलाईन क्रमांक सुरू केलेला आहे. तसेच रिक्षा चालकांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्जदारांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक लिंकमध्ये द्यावा लागणार आहे. मात्र ज्या रिक्षा परवाना धारकांकडे आधार कार्ड नसेल, किंवा त्यावरील माहिती अद्ययावत केलेली नसेल, अशा परवाना धारकांनी थेट परवाना असलेल्या आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.ऑनलाईन अर्ज करतांना हे लक्षात ठेवा-- आपले वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि आधार क्रमांक लागणार- ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.- तुमचा आधार लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर पाठविलेल्या ओटीपीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाईल.- अर्जदाराने “वारसा/ उत्तराधिकारी” हा पर्याय निवडावा व परवान्याची प्रत अपलोड करावी.- आपण समान मोबाइल नंबर वापरुन आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details