मुंबई - बुधवारी सकाळीपासून राज्यात १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी १६ रुग्ण मुंबईमध्ये तर दोन रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२० वर पोहोचली आहे. तर एकूण १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आढळले १८ नवे रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३२० वर.. - कोरोना विषाणू
बुधवारी सकाळीपासून राज्यात १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी १६ रुग्ण मुंबईमध्ये तर दोन रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२० वर पोहोचली आहे. तर एकूण १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आढळले १८ नवे रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३२० वर..
दिल्लीतील निझामुद्दील मरकझ प्रकरणाशी संबंधित ६० लोकांना पुण्यात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यांपैकी कोणालाही अद्याप कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. या सर्वांचे स्वॅब नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला पुण्यातील एकूण १३० लोकांनी हजेरी लावली होती.
यांपैकी बरेच लोक सध्या पुण्यात नाहीत, किंवा समोर आले नाहीत. या सर्व लोकांना शोधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.