महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mahavikas Aghadi : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य? - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मराठी बातमी

होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( Sthanik Swarajya Sanstha Election ) निवडणुका महा विकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) माध्यमातून लढण्याचे संकेत खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Ncp Leader Sharad Pawar ) यांनी दिले आहेत.

mahavikas aghadi
mahavikas aghadi

By

Published : May 11, 2022, 9:49 PM IST

मुंबई -होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( Sthanik Swarajya Sanstha Election ) निवडणुका महा विकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) माध्यमातून लढण्याचे संकेत खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Ncp Leader Sharad Pawar ) यांनी दिले आहेत. मात्र, निवडणुकांच्या घोषणेआधीच स्थानिक पातळीवरचे वादंग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole ) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी शक्य आहे का?, याबाद्दल आपण जाणून घेणार आहोत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन आठवड्यांत जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न उद्भवला असून, निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यास राज्य सरकार कोंडीत सापडणार आहे. मात्र, या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात, असे संकेत खुद्द शरद पवार यांनी दिले आहेत. मात्र, महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाचे याबाबत एकमत झालेले नाही.

तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही शरद पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यास महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हेदेखील स्पष्ट होत आहे. पण, तिन्ही पक्ष म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवणे स्थानिक पातळीवर शक्य आहे का?. राज्य पातळीवर ज्याप्रमाणे तीन पक्ष एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत एकत्र येऊन सत्तास्थापन करतात. त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवर हा फॉर्मूला चालेल का?, याबाबत आता राजकीय वर्तुळात शंकाकुशंका निर्माण केल्या जात आहेत.

जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना

महाविकासआघाडी प्रत्येक तालुक्यात करण्याचा प्रयत्न - शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर राज्याच्या प्रत्येक तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात यासाठी प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांनी सांगितले. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षा पक्षा मध्ये मतभेद असू शकतील. हे मतभेद मिटवण्याचे काम प्रत्येक पक्षाचे ज्येष्ठ नेते करतील. जेणेकरून स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आणि नेत्यांचे एकमत होणे जास्त आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना एकजुटीने सोबत राहून निवडणुकीचे काम अजून जोमात करता येईल, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसचा विश्वासघात? - आतापर्यंत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने काँग्रेसचा स्थानिक पातळीवर विश्वासघात केला आहे. नुकताच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. काही दिवसांपूर्वी भिवंडीमध्ये 19 काँग्रेस महानगरपालिकेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे आघाडी आणि मैत्री करायची असेल, तर ती प्रामाणिकपणे केली गेली पाहिजे. सोबत राहून विश्वास घात करणे योग्य नाही, अशी टोकाची भूमिका नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले यापुढच्या बाबत आपण काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी शक्य नाही -शरद पवार स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांसाठी तिन्ही पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात मतभेद अद्याप संपलेले नाहीत. त्यामुळे राज्यभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडी शक्य आहे का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, शरद पवार हे खुद्द स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न करत असले तरी, राज्यभरात ते शक्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवर असलेल्या मुद्द्यांवर लढल्या जातात. स्थानिक पातळीवरचा विचार करून कोणत्याही पक्षाची मदत तो घेत असतो. ज्यामध्ये अनेक वेळा काँग्रेस आणि भाजपची देखील मदत स्थानिक पातळीवर एकमेकांना होत असते. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये थेट महाविकासआघाडी करण्याचा प्रयत्न पूर्ण होणे शक्य नसल्याचे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -Railway Ministry Advises Wear Mask : प्रवाशांनो लक्ष द्या; रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक

ABOUT THE AUTHOR

...view details