मुंबई -महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे सहसंचालक अनिल जाधव यांना मंगळवारी (दि.04) रोजी एसीबीने लाच घेताना अटक ( Maharashtra State Vocational Education Joint Director arrested ) केली आहे. त्यानंतर एसीबीने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. 5 लाख रुपयांची लाच घेताना मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयातून अटक ( Vocational Education Joint Director Arrested ACB ) करण्यात आली आहे.
रंगेहात केले अटक -
एका व्यक्तीने या संदर्भात एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी ही रक्कम देण्याचं ठरलं आणि जेव्हा अनिल जाधव हे 5 लाखांची लाच घेत होते. त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. 7 डिसेंबर रोजी संबंधित इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनिल जाधव यांच्या संबंधित तक्रार केली होती. या तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा केली आणि त्यानंतर मंगळवारी दि. 4 रोजी अनिल जाधव यांना लाच घेताना रंगेहात अटक केले आहे.